Post Thumbnail

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत ६२० पदांची मोठी भरती सुरू – आजच अर्ज करा! जाणून घ्या पगार व शेवटची तारीख

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिका गट-क आणि गट-ड मधील विविध रिक्त पदांसाठी भरती करत आहे. या भरतीसाठी एकूण ६२० पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.

या भरती प्रक्रियेत कोणकोणती पदे आहेत, अर्ज कसा भरायचा, शेवटची तारीख काय आहे, वेतनश्रेणी किती आहे – या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

पदाचे नाव

गट क

  • बायोमेडिकल इंजिनियर
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
  • उद्यान अधिक्षक
  • सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
  • वैद्यकीय समाजसेवक
  • डेंटल हायजिनिस्ट
  • स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M.)
  • डायलिसिस तंत्रज्ञ
  • सांख्यिकी सहाय्यक
  • इसीजी तंत्रज्ञ
  • सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
  • आहार तंत्रज्ञ
  • नेत्र चिकित्सा सहाय्यक
  • औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी
  • आरोग्य सहाय्यक (महिला)
  • बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
  • पशुधन पर्यवेक्षक
  • ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (A.N.M.)
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
  • शस्त्रक्रियागृह सहाय्यक
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • वायरमन
  • ध्वनीचालक
  • उद्यान सहाय्यक
  • लिपीक-टंकलेखक
  • लेखा लिपिक

गट ड

  • शवविच्छेदन मदतनीस
  • कक्षसेविका/आया
  • कक्षसेवक (वॉर्डबॉय)

पदसंख्या – वरील विविध पदांसाठी एकूण ६२० जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

वयोमर्यादा – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १८ – ३४ वर्षे
राखीव प्रवर्ग – १८- ४३ वर्षे

अर्ज शुल्क – दोन प्रवर्गात विभागली आहे.
खुला प्रवर्ग – १०००/-
राखीव प्रवर्ग – ९००/-

अर्जपद्धत – वरील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाइट – https://www.nmmc.gov.in/

येथे ऑनलाईन अर्ज करा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html

अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज भरायच्या आधी भरतीसंदर्भातील जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२५ आहे.

त्याशिवाय, कोणकोणती पदे भरायची आहेत, पदांची माहिती, पगार किती आहे, वयोमर्यादा व सूट, निवड कशी होणार, अटी-शर्ती, शिक्षण पात्रता, आरक्षणाची माहिती, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क आणि अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिली आहे.